रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सोनिया, खर्गे जाणार नाहीत

0
12

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला काँग्रेसने उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. भाजपने राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे, त्यामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित न राहण्याच्या निर्णयाचे कारण दिले आहे. प्रभू राम हे आपल्या देशातील कोट्यवधी लोकांचे पूजनीय आहेत. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. पण भाजप आणि आरएसएसने अयोध्या मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन भाजप नेत्यांकडून निवडणुकीत फायद्यासाठी केले जात असल्याचे उघड आहेे, असे काँग्रेसने म्हटले आहे.