कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो व विरोधी नेते प्रतापसिंह राणे काल दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, फालेरो अध्यक्ष झाल्याने माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्या आशीर्वादामुळे वेगवेगळ्या समित्यांचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या काहीनी आपले आसन स्थिर रहावे म्हणून दिल्लीतील केंद्रीय नेत्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.