राणेंच्या कॅबिनेट दर्जाविरोधातील याचिका न्यायालयाने स्वीकारली

0
20

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दाखल करून घेतली.

या याचिकेवरील पुढील सुनावणी २ मे रोजी घेतली जाणार आहे. राज्य सरकारने गेल्या ७ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारचा प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे.

कॅबिनेट दर्जामुळे राणे हे १२ कर्मचारी आपल्या सेवेदाखल घेण्यास पात्र ठरणार असून, या कर्मचार्‍यांवर साधारण वार्षिक सुमारे ९० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत, असा दावा ऍड. रॉड्रिग्स यांनी पत्रकारांशी बोलताना केला.