राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत जे भाषण केले ते हिंसेला चिथावणी देणारे होते. एकदा होऊनच जाऊ द्या, असे खुले आव्हान त्यांनी दिले त्याचा अर्थ काय? एका व्यक्तीमुळे तुम्ही राज्याची शांतता पणाला लावणार आहात का?, अशा प्रश्नांची ठाकरे सरकारवर सरबत्ती करत खासदार आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज यांना अटक करून तुरुंगात टाका म्हणजे त्यांचे डोके ठिकाणावर येईल. आपण काय बोलले पाहिजे आणि काय नाही, याचे भान त्यांना राहील, असे ओवेसी म्हणाले.