राज ठाकरेंची मुंबईत सभा

0
129

मी कोणथेही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही. रेल्वे भरती, फेरीवाले, मराठी चित्रपट, मराठी माणसासाठी आंदोलने केली. ती यशस्वी करून दाखवली. नोकर्‍या मिळतील, बँकांची कामं सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मागाठणे येथील प्रचार सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल प्रचाराच्या अखेरच्या रविवारी मुंबईत प्रचाराचा सपाटा लावला होता.

बँका लुटल्या जात आहेत, आणि सरकार, रिझर्व्ह बँक काहीच करत नाही असा आरोप करत ठाकरे यांनी, सरकार तुमच्या हातात आहे तर उद्योगधंदे का बंद पडताहेत? असा सवाल केला.
काश्मीरमधलं ३७० कलम हटवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन मात्र त्यासाठी महाराष्ट्रात मत मागण्याची गरज नाही. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोला असे आवाहन ठाकरे यांनी केले.