राज्य सरकारकडून काजूपाठोपाठ आता हुर्राकच्या जिओग्राफिकल इंडीकेशन (जीआय) मानांकनासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या नोडल एजन्सीने हा प्रस्ताव केंद्रीय जीआय रजिस्ट्रीला पाठवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक काजू उत्पादकांना लाभ होण्यासाठी त्यांच्या संघटनेच्या नावे अर्ज करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील काजू आणि फेणीला जीआय मानांकन मिळाले आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांची एक संघटना तयार करण्यात आली आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गोव्यात हूर्राकला तसेच हुर्राकच्या पासून बनविण्यात येणारे कॉकटेल ड्रिंक चालू शकते असेही सूत्रांनी सांगितले.