काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य पर्यटन धोरणाला मंजुरी देण्यात आली. या धोरणात ग्रामीण पर्यटन, इको टुरिझम तसेच वारसा पर्यटन, आरोग्य पर्यटन आदींवर भर देण्यात आला असल्याची माहती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना दिली.
त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीत सौर ऊर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील १५० घरांना वीज देण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. तसेच कोविड औषधखरेदी व खर्चासाठीच्या १०० कोटी रुपयांच्या फाईल्सलाही सरकारने मंजुरी दिली आहे अशी माहिती यावेळी पर्यटनमंत्री आजगावकर यांनी दिली.