राज्याला खास आर्थिक पॅकेज

0
74

पर्रीकरांची भाजप बैठकीत माहिती
गोव्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी येत्या तीन महिन्यांत राज्याला खास आर्थिक पॅकेज मिळणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल भाजपच्या प्रदेश कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितले. तर पक्षाचे महासचिव सतीश धोंड यांनी पक्षापेक्षा कोणीही श्रेष्ठ असल्याचे मानू नये, असे या बैठकीत सांगितले.इफ्फी महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पर्रीकर यांचे काल दिल्लीहून गोव्यात आगमन झाले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी भाजपच्या बैठकीत मार्गदर्शन केले. त्याआधी त्यांनी इफ्फीच्या उद्घाटन सोहळा होणार असलेल्या बांबोळी येथील डॉ. शामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.