राज्याला दिवाळखोरीत ढकलून, सामान्यांना आर्थिक बोज्याखाली दाबून व लोकांच्या भावनांकडे काणाडोळा करत स्वप्नांचे मनोरे बांधणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली.
अर्थसंकल्प सादर करताना ११००० सरकारी नोकर्या उपलब्ध करून देणार म्हणून सांगणार्या सरकारने आजच मी विचारलेल्या विविध सरकारी खात्यांमध्ये किती नोकर्या उपलब्ध आहेत याप्रश्नाचे उत्तर नाही. विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी सरकारने कोणतीच योजना जाहीर केली नसल्याची टीकाही कामत यांनी केली.