राज्यात 2023 मध्ये 276 अपघाती मृत्यू

0
7

राज्यात वर्ष 2023 मध्ये अपघातांमध्ये एकूण 276 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 2023 मध्ये 2832 अपघातांची नोंद झाली, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, नववर्षाच्या प्रारंभीच्या दोन दिवसांत रस्ता अपघातात सहाजणांचा बळी गेला आहे.

वर्ष 2022 च्या तुलनेत अपघाताची संख्या थोडीशी कमी आहे. 2022 मध्ये 3000 पेक्षा जास्तअपघातांची नोंद झाली होती. तसेच, अपघातांत 271 जणांचा बळी गेला. गत 2023 मध्ये अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 256 अपघातांमध्ये 276 जणांचा बळी गेला आहे.

राज्यातील 226 अपघात भीषण अपघात म्हणून नोंद झाले आहेत. तसेच, वाहन अपघातात 325 जण गंभीर जखमी झाले. अपघातात 816 जण किरकोळ जखमी झाले आहेत. राज्यातील 1 हजार 385 अपघातात एकही व्यक्ती जखमी झाली नाही.