राज्यात ७ जूनपर्यं जोरदार पाऊस शक्य

0
19

राज्यात चोवीस तासात सांगे येथे सर्वाधिक २.१३ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात येत्या ७ जूनपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनपूर्व पावसाने म्हापसा, पेडणे, वाळपई, केपे, सांगे भागात जोरदार हजेरी लावली. राज्यातील अन्य भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सांगेनंतर म्हापसा येथे १.६१ इंच, वाळपई येथे १.०३ इंच, पेडणे येथे १.०१ इंच, केपे येथे ०.८१ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात मोसमी पावसाचे आगमन पोषक वातावरणामुळे अजूनपर्यंत झालेले नाही. गोवा राज्याच्या दक्षिण सीमेच्याजवळ कर्नाटकपर्यंत मोसमी पाऊस पोहोचलेला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.