राज्यात पर्यटन खात्यातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने येत्या दि. २६ फेब्रुवारी ते दि. १ मार्च या कालावधीत चार शहरात कार्निव्हल साजरा केला जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी पणजी शहरात कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. २७ फेब्रुवारीला मडगावात, दि. २८ फेब्रुवारीला वास्कोत आणि १ मार्च रोजी म्हापसा येथे कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन केले जाणार आहे.
कोविड मार्गदर्शक तत्त्वे आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे पालन करून हा कार्निव्हल साजरा केला जाणार आहे. या मिरवणुकीत व्यावसायिक किंवा राजकीय टिप्पणी करणारे चित्ररथ असणार नाहीत.