राज्यात चोवीस तासांत नवीन ५३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२,४५८ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८६५ एवढी आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७५६ एवढी आहे.
राज्यातील आणखी ६६ कोरोना रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,८३७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९१ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ५१ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २४ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
चोवीस तासांत नवीन १०८५ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून ४.८८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०३ एवढी आहे. पणजी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६८ एवढी आहे. राज्यातील इतर भागांतील आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.