राज्यात २४ तासांत नवे १३ कोरोनाबाधित

0
10

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १३ कोरोनाबाधित आढळून आले असून, एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या १०१ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ११५९ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यात १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आता ३८३० एवढी झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत आणखी १९ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४० टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत एका कोरोनाबाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आले असून, कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.