राज्यात हळूहळू पाऊस जोर धरणार

0
7

पूर्व-पश्चिम शिअर झोन तयार झाल्याने गोव्यातील पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने काल व्यक्त केली. राज्यात 9 आणि 10 जूनला काही भागात जोरदार पावसाची शक्यता असून, 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच, राज्यात 7 आणि 8 जूनला काही भागात पाऊस पडू शकतो. राज्यात मोसमी पाऊस 4 जूनला दाखल झाल्यानंतर मंदावला आहे. राज्यातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले. राज्यात चोवीस तासांत काही भागात पावसाची नोंद झाली. जुने गोवे येथे 41 मि.मी., दाबोळी येथे 23.8 मि.मी., म्हापसा येथे 22.3 मि.मी., मुरगाव येथे 20.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. पणजी, पेडणे, साखळी, फोंडा, सांगे, मडगाव येथे तुरळक प्रमाणात पावसाची नोंद झाली.