राज्यात गेल्या चोवीस तासंात एका बळीची नोंद झाली असून नवे २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ५१ रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८६ टक्के एवढे आहे. काल मंगळवारी ४ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या राज्यातील एकूण बळींची संख्या ३३६३ एवढी झाली आहे. तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४५४ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यातून आणखी ५१ रुग्ण बरे झाले आहेत.
काल रविवारी इस्पितळातून ५ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. तर करोनाची लक्षणे जाणवल्याने ४ जणांना इस्पितळात भरती करण्यात आले. १९ जणांनी घरी विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. काल बुधवारी राज्यात कोरोनासाठी ३१९० जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली.