राज्यात संततधार सुरूच

0
110

राज्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे झाडांची पडझड सुरूच आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील चोवीस तासात ४.७२ इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यत ९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पाऊस इंचाचे शतक गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.

पर्वरीत तिसर्‍या मांडवी पुलाजवळ एका कारगाडीवर झाड कोसळले. राज्यात आत्तापर्यत वाळपई येथे सर्वांधिक ११३.६४ इंच पावसाची नोंद झाली आहे.
सांगे येथे १०३.३३ आणि साखळी येथे १०२.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे.