राज्यात शनिवारपर्यंत जोरदार पाऊस शक्य

0
11

पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून, त्यामुळे येत्या १० सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. या दरम्यान उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली. या काळात काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दि. ७ रोजी पिवळ्या रंगाचा इशारा दिला आहे. दि. ८ रोजी नारंगी रंगाचा, तर दि. ९ व दि. १० रोजी पुन्हा पिवळ्या रंगाचा इशारा दिला आहे. या काळात काही ठिकाणी ताशी ४० किमी. एवढ्या वेगाने वाहणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.