राज्यात वीज दरात वाढ होणार; अधिसूचना जारी

0
18

गोवा सरकारच्या वीज खात्याकडून गोवा सार्वजनिक प्रकाश शुल्क कायदा २०२१ अर्तंगत सार्वजनिक प्रकाश शुल्क आकारले जाणार असल्याने राज्यातील वीज दरात वाढ होणार आहे. सार्वजनिक प्रकाश शुल्क १ जूनपासून आकारले जाणार आहे. यासंबंधीची अधिसूचना वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी २१ जून रोजी जारी केली आहे.

या कायद्याखाली घरगुती वापरातील कमी दाबाच्या विजेसाठी प्रती युनिट ५ पैसे, व्यावसायिक वापराच्या कमी दाब, उच्च दाब घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वापरासाठीच्या विजेसाठी प्रति युनिट ८ पैसे आकारले जाणार आहेत. कमी दाबाच्या कृषीसाठी प्रति युनिट ५ पैसे आणि उच्च दाबाच्या कृषी वीज वापरासाठी प्रति युनिट ८ पैसे आकारले जाणार आहेत. वीज दरवाढीतून इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशनला वगळण्यात आले आहे.