राज्यात विनाशकारी प्रकल्प साकारणार नाही : फालेरो

0
18

राज्यात तृणमूल कॉंग्रेसच्या आघाडीखालील सरकार सत्तेवर आले, तर हे सरकार गोव्याचा निसर्ग व पर्यावरण याचे नुकसान करणारा कोणताही प्रकल्प गोव्यात होऊ देणार नसल्याचे काल तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी पणजीतलल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यापूर्वी सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी गोव्याचा निसर्ग व पर्यावरणाचे मोठे नुकसान केले. गोव्यात कोळसा कुणी आणला आणि आता कोणता पक्ष गोव्याचे कोळसा हबमध्ये रुपांतर करू पाहत आहे, ते सगळ्यांना माहीत आहे, असे फालेरो म्हणाले.

रेल्वे दुपदरीकरणाला कोणी मंजुरी दिली, बेळगाव-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला कोणी मान्यता दिली, गोव्याच्या निसर्गासाठी पूर्णपणे विनाशकारी ठरतील, असे तीन प्रकल्प कोण गोव्यावर लादू पाहत आहेत, हे जनतेला माहीत आहे, असेही फालेरो म्हणाले.