आजपासून दोन दिवस गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रातील मराठवाडा भागात तयार झालेल्या चक्री आवर्तनामुळे गोव्यात 18 एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या 18 ते 20 एप्रिलपर्यंत राज्यात तापमानात वाढ होण्याची तसेच दमटपणा वाढण्याचीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गोव्यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर कोकणमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे म्हटले असून, गोव्याला मात्र ह्या दिवसात उष्णतेच लाटेला सामोरे जावे लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कालपासून राज्यात दमट वातावरण होते. आज व उद्या राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.