राज्यात रविवारपासून मुसळधार पाऊस शक्य

0
191

मागील दोन-तीन दिवसांप्रमाणेच 16 व 17 ऑगस्ट रोजी राज्यात तुरळक प्रमाणात पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर 18 व 19 ऑगस्ट या दरम्यान राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, अन्य भागांत तुरळक पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 20 व 21 ऑगस्ट या दरम्यान राज्यात तुरळक व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.