राज्यात मोसमी पावसाचे शतक पूर्ण

0
8

गेल्या चार दिवसांत ५ इंचांची नोंद

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे चोवीस तासात उत्तर गोव्यातील पेडणे, म्हापसा, साखळी, ओल्ड – गोवा, फोंडा या भागात जोरदार पावसाची नोंद झाली असून राज्यात मोसमी पावसाने इंचांचे शतक काल पूर्ण केले आहे.

राज्यात मागील चार दिवसांत साधारण ५ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चार दिवसांत हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी सकाळी ८.३० पर्यंत ९९.६६ इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत पेडणे येथे सर्वाधिक ३.५३ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा येथे ३.३८ इंच, साखळी येथे २.५३ इंच, फोंडा येथे १.८० इंच, ओल्ड गोवा येथे १ इंच, पणजी येथे ०.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई भागातील पावसाची माहिती प्राप्त झाली नाही. तर, दक्षिण गोव्यातील काणकोण, मडगाव, मुरगाव, केपे, सांगे, दाबोळी या भागात कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.