राज्यात मतदाना दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर

0
16

राज्य सरकारने सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानानिमित्त भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंबंधीचा आदेश सर्वसाधारण प्रशासन विभागाचे अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी काल जारी केला. हा आदेश राज्यातील औद्योगिक कर्मचारी, सरकार खात्यातील रोजंदारीवरील कर्मचारी, खासगी व्यापारी व औद्योगिक कर्मचारी, सर्व खासगी आस्थापनांतील कर्मचारी यांना लागू आहे.