राज्यात गेल्या २४ तासांत नवीन ५७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,६४८ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७९ एवढी झाली आहे.
कोरोना बळींची एकूण संख्या ७८८ एवढी झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये कळंगुट येथील ३० वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले. या कोरोना रुग्णाला २० फेब्रुवारीला इस्पितळात दाखल करण्यात आला होता.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४१ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १७७६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३.२० टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३१ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. पर्वरी आरोग्य केंद्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २७ झाली आहे. फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ३० रुग्ण, केपे २४ रुग्ण, म्हापसा २७ रुग्ण, कांदोळी ३७ रुग्ण, कासावली २१ रुग्ण, चिंबल ३८ रुग्ण तर कुडचडे येथे २० रुग्ण आहेत. शिरोडयात नवीन १ रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील इतर भागातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या वीसच्या खाली आली आहे.