राज्यात पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या दरात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १ जून ते २० जून या काळात पेट्रोलच्या दरात ७.३५ पैसे तर डिझेलच्या दरात ७.८१ पैसे एवढी वाढ झाली आहे. पणजी शहरात पेट्रोलचा दर ७६.२२ पैसे आणि डिझेलचा दर ७३.२७ पैसे एवढा झाला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.