राज्यात मागील आठ दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू आहे. मागील आठ दिवसात पेट्रोलच्या दरात १ रुपया ७७ पैसे एवढी वाढ झालेली आहे. रविवारी पणजीत ६९.८१ रुपये दराने पेट्रोलची विक्री केली जात होती.
गेल्या १२ सप्टेंबरला पेट्रोलचा दर ६७.८९ असा होता. त्यानंतर १३ सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात १९ पैसे वाढ झाली. १४ सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात १६ पैसे कपात झाली. त्यानंतर पेट्रोलच्या दरात वाढ सुरूच आहे. दर दिवशी पेट्रोलच्या दरात साधारण १३ पैसे, २४ पैसे, २५ पैसे अशी वाढ नोंद होत आहे. २१ सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात ३६ पैसे वाढ झाली आहे. तर काल दि. २२ रोजी पेट्रोलच्या दरात ३८ पैसे अशी वाढ झाली आहे.
गेल्या १७ सप्टेंबरला सौदीतील दोन तेलाच्या प्रकल्पावरील हल्ल्यामुळे इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर राज्यातील पेट्रोलच्या दरात वाढ कायम आहे.