राज्यात पावसाने पुन्हा एकदा कालपासून जोर धरला आहे; मात्र गेल्या चोवीस तासांत राज्यात केवळ 0.63 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 65.20 इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 77.72 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मागील दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी होती. तथापि, शुक्रवार दुपारपासून पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. पणजीमध्ये गुरुवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 यावेळेत 2 इंच पावसाची नोंद झाली. याच काळात जुने गोवे येथे 1.51 इंच, मुरगाव येथे 1 इंच, पिळर्ण येथे 1.55 इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, 13 जुलैला उत्तर गोव्यातील शापोरा ते पणजी (मालीम) दरम्यानच्या समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उसळणाऱ्या लाटांची उंची 2.6 ते 3.3 मीटरपर्यंत असू शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.