राज्यात पावसाने धरला जोर

0
6

राज्यात कालपासून पावसाने जोर धरला असून, पहाटेपासून रात्रीपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. परिणामी चोवीस तासांत 3.51 इंच पावसाची नोंद झाली. राज्यभरात जोरदार पावसामुळे पडझडीच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 31.81 इंच पावसाची नोंद झाली आहे.
चोवीस तासांत फोंडा येथे सर्वाधिक 6.88 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 37 घटनांची नोंद झाली. हवामान विभागाने येत्या 1 जुलैपर्यंत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, राज्यातील समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.