मोसमी पावसाने माघार घेण्यापूर्वी राज्यात मेघगर्जनेसह हजेरी लावली. देशातून मोसमी पाऊस परतीच्या वाटेवर आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्रातील काही भागातून परतून गोव्याच्या उत्तरेकडील सीमेच्या जवळ येऊन ठेपला आहे. राज्यातून मोसमी पावसाच्या माघारीच्या अधिकृत घोषणेपूर्वी राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यातील अनेक भागांत काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. राज्यात चोवीस तासांत 4.7 मिमी. पावसाची नोंद झाली. परतीच्या पावसामुळे तयार झालेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. गोव्यातून मान्सून माघारीची अधिकृत घोषणा एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.