राज्यात पाऊस अन्‌‍ पडझड सत्र सुरुच

0
20

राजधानी पणजीसह उत्तर गोव्यातील अनेक भागांना काल जोरदार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. जोरदार पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडझडीच्या अनेक घटनांची नोंद झाली. पणजीसह उत्तर गोव्यात काही ठिकाणी इमारती, घरांवरील पत्र उडून गेल्याच्याही घटना घडल्या.राज्यात चोवीस तासांत 2.56 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 107.60 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने 25 आणि 26 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चोवीस तासांत वाळपई, केपे, सांगे येथे जोरदार पावसाची नोंद झाली. वाळपई येथे सर्वाधिक 5.87 इंच पावसाची नोंद झाली.