राज्यात नोकर्‍यांच्या संधीबाबत मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आश्‍वासन

0
82

प्रदेश भाजपच्या काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नोकर्‍यांच्या संधी निर्माण करण्याची जोरदार मागणी केली.
गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वरील बैठकीत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. सरकारच्या कार्यपध्दतीवरही चर्चा करण्यात आली. आर्थिक अडचण असतानाही सरकारने राबविलेल्या विविध योजनांवर कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी राज्यात नोकर्‍यांच्या संधी निर्माण करण्याचे आश्‍वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून दि. १३ ते २३ या काळात निर्मल गोवा सुंदर गोवा अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली.
पक्षाचे सर्व कार्यकर्ते राज्यातील १८८ पंचायती, नगर पालिका, महापालिका क्षेत्रात जाऊन वरील मोहीम राबवतील असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारास गोव्याहून कार्यकर्ते
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यातून कार्यकर्ते पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती तेंडूलकर यांनी दिली. दरम्यान, प्रदेश भाजप अध्यक्ष तेंडुलकर व पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश धोंड आज मुंबईला रवाना होतील.