राज्यात नव्या ३५ कोरोनाबाधितांची नोंद

0
11

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकाही कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद झालेली नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, रुग्णसंख्या ४१३ वर पोहोचली आहे.

राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३८७ एवढी आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३४ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत १९४० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३५ नमुने बाधित आढळून आले. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ७ रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे.

मडगावात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मडगावात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असून, तेथे ७२ रुग्ण आहेत.