राज्यात चोवीस तासात नवीन १२२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९३३ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ९.५६ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १२७६ जणांचे स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. चोवीस तासांत आणखी १४६ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के एवढे आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३९५५ एवढी आहे.