राज्यात दोन दिवस मध्यम पाऊस

0
40

चालू महिन्याच्या शेवटापर्यंत म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असून मच्छिमारांनी मच्छिमारीसाठी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे. कर्नाटक किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत ‘ट्रफ’ सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.