राज्याला मागील तीन दिवस झोडपून काढल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. मागील चोवीस तासात साडे तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, मागील तीन दिवसांत १०.९८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात २ जुलैपासून जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती. या दिवशी साडे चार इंच पावसाची नोंद झाली. ३ रोजी पावणे तीन इंच आणि ४ रोजी ३.४९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासात सांगे येथे सर्वाधिक ६.५८ इंच पावसाची नोंद झाली. साखळी येथे ४.५९ इंच, केपे येथे ४.५३ इंच, पेडणे येथे ४.४० इंच, पणजी येथे १.९३ इंच, ओल्ड गोवा येथे ३.३२ इंच, काणकोण येथे २.८१ इंच. दाभोळी येथे २.०७ इंच, मुरगाव येथे १.११ इंच पावसाची नोंद झाली.