राज्यात जेएन.1चे आतापर्यंत 51 रुग्ण

0
25

कोविडचा उपप्रकार जेएन.1 चे राज्यात आत्तापर्यंत 51 रुग्ण आढळून आले आहेत. इंडियन एसएआरएस कोविड 2 जिनोमिक्स कन्सोर्टियम या संस्थेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गोव्यात जेएन.1 चे 51 रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये या उपप्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळनंतर दुसऱ्या क्रमांकावर गोवा राज्य आहे. देशात आत्तापर्यंत जेएन.1 चे एकूण 197 बाधित आढळून आले आहेत. केरळ (83), गोवा (51), गुजरात (34), कर्नाटक (8), महाराष्ट्र (8), राजस्थान (5), तामिळनाडू (4), तेलंगणा (2) ओडिशा (1) आणि दिल्ली (1) या राज्यात रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जेएन.1 ला त्याचा झपाट्याने वाढणारा प्रसार पाहता स्वतंत्र प्रकार म्हणून वर्गीकृत केले आहे. हा उपप्रकार कमी धोक्याचा असल्याचे म्हटले आहे.