राज्यात चोवीस तासांत ५७ नवे कोरोना रुग्ण

0
14

राज्यात चोवीस तासांत नवीन ५७ कोरोनाबाधित आढळून आले असून जून महिन्याच्या बारा दिवसांत नवीन ६५७ बाधित आढळून आले आहेत. कोरोना सक्रिय रुग्ण पाचशेच्याजवळ पोहोचली असून सक्रिय रुग्ण संख्या ४७३ एवढी झाली आहे. राज्यातील बाधित रुग्णांचे प्रमाण १०.६५ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत नवीन ५३५ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत. १० जूनला एक हजारापेक्षा जास्त स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आणखी कोरोना बळींची नोंद नाही. तसेच चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करावा लागलेला नाही. मागील बारा दिवसांत एकूण ३१७ तर गेल्या चोवीस तासांत आणखी ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.