राज्यात गत 3 दिवसांत केवळ 1.69 इंच पाऊस

0
3

राज्यात मागील तीन दिवसांपासून मोसमी पावसाच्या प्रमाणात घट झाली असून, गेल्या तीन दिवसात केवळ 1.69 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 20.61 इंच पावसाची नोंद झाली असून, धारबांदोडा येथे सर्वाधिक 28.14 इंच पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मे महिन्यात 26 इंच अशी विक्रमी पावसाची नोंद झाली, तर जून महिन्याच्या सुरुवातीला मोसमी पावसाचे प्रमाण कमी होते. यानंतर 10 ते 15 जून या काळात जोरदार पावसाची नोंद झाली. आता गेले तीन-चार दिवस राज्यात मोसमी पाऊस मंदावला आहे. राज्यात चोवीस तासांत 0.36 इंच पावसाची नोंद झाली. सांगे येथे सर्वाधिक 1.07 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे 0.98 इंच, वाळपई येथे 0.88 इंच, काणकोण येथे 0.49 इंच, धारबांदोडा येथे 0.41 इंच अशा पावसाची नोंद झाली. म्हापसा, पेडणे, पणजी, जुने गोवे, साखळी, फोंडा, मडगाव, मुरगाव येथे तुरळक सरी कोसळल्या. येथील हवामान विभागाने 20 ते 25 जून दरम्यान तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे.