राज्यात कोरोनामुळे ८ मृत्यू

0
289

>> नवीन ५३६ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ३० हजारांजवळ

राज्यात चोवीस तासांत नवे ५३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आणखीन ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३० हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ८७९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५६४६ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ३७६ एवढी झाली आहे.

८ जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. काल आणखी ८ जणांचा बळी गेला आहे. गोमेकॉमध्ये ५ आणि कोविड इस्पितळात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ओल्ड गोवा येथील ७५ वर्षांची महिला रुग्ण, हळदोणा येथील ७७ वर्षांचा पुरुष रुग्ण, चोडण येथील ७४ वर्षांचा पुरुष रुग्ण, फोंडा येथील ४९ वर्षांचा पुरुष रुग्ण, वास्को येथील ८१ वर्षांचा पुरुष रुग्ण, वास्को येथील ७६ वर्षांचा पुरुष रुग्ण, आके मडगाव येथील ५० वर्षांचा पुरुष रुग्ण आणि मालभाट मडगाव येथील ५५ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे.

३९५ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखीन ३९५ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णाची संख्या २३,८५७ एवढी झाली आहे. कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या ४०२ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १३ हजार १८४ एवढी झाली आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १८७२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ५३६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जीएमसी इस्पितळात २४७ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मडगाव शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४५१ एवढे आहेत. साखळी आरोग्य केंद्राच्या कक्षेत ४४५ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्राच्या कक्षेत ३६७, पणजी शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत ३१९ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्राच्या कक्षेत ३१० रुग्ण आहेत. डिचोली, पेडणे, वाळपई, म्हापसा, चिंबल, फोंडा, कुडतरी आरोग्य केंद्राच्या कक्षेत दोनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत.