>> काल नवीन ८ संशयित
राज्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या ३९ झाली असून नवीन ८ कोरोनाबाधित रुग्ण काल आढळून आले आहेत. इस्पितळातील आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने जारी केलेल्या दैनंदिन अहवालात दिली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड प्रयोगशाळेत ३३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३१६ नमुने निगेटिव्ह आणि ८ नमुने पॉझिटीव आढळून आले आहेत. तसेच ८ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
नवी दिल्ली येथून आलेल्या रेल्वेगाडीतील अनेक प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी मध्यरात्री जारी केलेल्या ट्विट संदेशात राज्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या ४२ झाल्याचे म्हटले होते. आरोग्य खात्याने जारी केलेल्या दैनंदिन अहवालात कोरोनाबाधितांची संख्या ३९ झाल्याचे म्हटले आहे.
आरोग्य खात्याने आंतर राज्य प्रवास करणार्या १०९ जणांना होम क्वारंटाईऩ केले आहेत. आत्तापर्यंत आंतरराज्य प्रवास केलेल्या सुमारे ४४४० जणांना होम क्वारंटाईऩखाली आणले आहेत. तर, ३७३ प्रवाशांना सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये ठेवले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५०७२ जणांना सरकारी क्वारंटाईन सुविधेखाली आणण्यात आले आहे.
कोरोना विषाणूबाधित ३९ जणांवर मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत. सरकारी इस्पितळामधील आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ९ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच क्वारंटाईऩ केंद्र आणि हॉटेलमध्ये ५८१ जणांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यात आले आहे.
राज्यात नव्याने आढळून आलेल्या ८ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नवी दिल्लीतून रेल्वेगाडीतून आलेल्या ४ प्रवाशांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये बार्ज घेऊन गेलेल्या वास्को येथील आणखी एकाला कोरोना विषाणूची बांधा झाली आहे.