>> आत्तापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची उच्चांकी संख्या
>> एकूण संख्या दीड हजारांजवळ
राज्यात नवीन ९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून राज्यात एकाच दिवशी आत्तापर्यंतची ही सर्वांत जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४४ झाली आहे. जुवारीनगर वास्को येथे नवीन ३२ रुग्ण आढळले असून जुवारीनगरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८० वर पोहोचली आहे. फोंडा, वाळपई, माशेल, म्हार्दोळ, गोवा वेल्हा येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्यखात्याने राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ६४ रुग्ण बरे झाल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १४८२ वर पोहोचली असून आत्तापर्यंत ७३४ रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यत ४ जणांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या दीड हजाराच्या जवळ जाऊन पोहोचली आहे.
जुवारीनगर वास्कोची वाटचाल दुसर्या मांगूर हिलच्या दिशेने सुरू झाली आहे. जुवारीनगरात नवीन ३२ रुग्ण काल आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ८० झाली आहे. जुवारीनगरात तपासणीचे काम सुरू असून आणखी रुग्ण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बायणा वास्को येथे नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ५४ झाली आहे. नवेवाडे वास्को येथे नवीन २ रुग्ण आढळले आहेत. येथे रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. तर, खारीवाडा येथे नवीन ३ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या २४ झाली आहे.
फोंडा, माशेल, म्हार्दोळात नवीन रुग्ण
फोंडा, माशेल, म्हार्दोळ या ठिकाणी नवीन ९ रुग्ण आढळून आले आहेत. म्हार्दोळ येथे आयसोलेटेड १ रुग्ण आढळला आहे. फोंडा येथे ५ रुग्ण आणि माशेल येथे ३ रुग्ण आढळून आले आहेत.
वाळपईत नवीन ३ रुग्ण
वाळपई येथे नवीन ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. वाळपई नजीकच्या गुळेली, मोर्ले आदी भागात यापूर्वी रुग्ण आढळून आलेले आहे. मोर्ले येथे आत्तापर्यंत २२ रुग्ण आढळून आले आहेत.
गोवा वेल्हा येथे १ रुग्ण
गोवा वेल्हा येथे आयसोलेटेड १ रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी पिलार येथेही एक आयसोलेटेड रुग्ण आढळून आलेला आहे. वेर्णा येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून येथील रुग्णांची संख्या ५ झाली आहे.
साखळीत ३ नवीन रुग्ण
साखळी येथे ३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. साखळीतील रुग्णांची एकूण संख्या ३४ झाली आहे.
साळ, पर्वरीत नवीन रुग्ण
साळ येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून साळातील रुग्णांची संख्या ५ झाली आहे. तसेच पर्वरी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ३ झाली आहे.
कामराभाटात नवीन रुग्ण
कामराभाट करंजाळे येथे नवीन १ रुग्ण आढळून आला आहे. या भागातील रुग्णांची संख्या २ झाली आहे. कामराभाट येथील नागरिकांच्या चाचणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
इंदिरानगरात नवीन २ रुग्ण
इंदिरानगर चिंबल येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून इंदिरानगरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. इंदिरानगर येथे कंटेनमेंट झोन जाहीर करून नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
केपे, मडगावात नवीन रुग्ण
केेपे येथे नवीन ५ रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या १२ झाली आहे. मडगाव येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ९ झाली आहे.
मांगूर लिंकसंबंधित २७ रुग्ण
मांगूर लिंकशी संबंधित नवीन २७ रुग्ण आढळून आले आहेत. मांगूर लिंकमधील रुग्णांची संख्या २२१ वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये नवीन रुग्ण आढळला नाही. १ जुलैच्या आकडेवारीमध्ये मांगूर हिलमध्ये २५३ रुग्ण दाखविण्यात आले होते. तर, २ जुलैच्या आकडेवारीत रुग्णसंख्या २४० एवढी दाखवली आहे.
आमदाराचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह
सासष्टीतील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या भाजप त्या आमदाराच्या कुटुंबातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून त्यांना उपचारार्थ कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये त्या आमदाराची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.