राज्यात कोरोनाचे आणखी २ बळी

0
19

राज्यात पंधरा दिवसांनंतर दोन कोरोना बळींची नोंद काल झाली असून नवीन ३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३८३२ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या २४ झाली आहे. मागील चोवीस तासांत आणखी ६७८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३ नमुने बाधित आढळून आले आहेत. आणखीन ४ कोरोना बाधित बरे झाले आहेत. कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण ९८.४३ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही.