अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा गोव्यापासून पुढे सरकल्याने राज्यातील पावसाची गती कमी होणार आहे. तरीही, २२ नोव्हेंबरपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता येथील हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीची नासधूस झाली आहे. अवकाळी पडणार्या पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.