राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत १३६२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यातील केवळ १८ जण कोरोनाबाधित सापडले. तसेच गेल्या २४ तासांत २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ही आता १५० पेक्षा कमी असून, सध्या राज्यात केवळ ११७ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.३९ टक्के एवढे आहे.
कोरोना बळींचे सत्र काही केल्या थांबत नसून, गेल्या २४ तासात एका रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही ३८२९ एवढी झाली आहे. तसेच आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही २ लाख ४१ हजार १९७ एवढी आहे.