राज्यात उद्या व परवा पावसाची शक्यता

0
18

येथील हवामान विभागाने येत्या 7 आणि 8 एप्रिल 2023 रोजी राज्यातील काही भागात हलका पाऊस कोसळण्याची शक्यता काल व्यक्त केली आहे. राज्यातील हवामानात बदल झाला असून पूर्वेकडील वाऱ्यामुळे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23.4 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. तापमान सामान्य तापमानापेक्षा कमीच नोंद झाले आहे.