बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात पाऊस कोसळणार असल्याच्या वृत्ताने राज्यातील शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. उद्या ८ व परवा ९ मार्च रोजी दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वरील दोन्ही दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. पुढील दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्रातही पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
गेल्या १७ जानेवारी रोजी सायंकाळी सत्तरी तालुक्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळा होता. त्यानंतर २३ जानेवारीला बार्देश, डिचोली, सत्तरी तसेच अन्य काही तालुक्यांमध्येही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यात पाऊस कोसळला नव्हता. पण दाट धुके पसरल्याने आंबा व काजू बागायतींवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.