राज्यात उद्यापर्यंत पावसाची शक्यता

0
5

येथील हवामान विभागाने राज्यातील काही भागांत शनिवार दि. 2 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यातून मान्सून माघारी परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील 30 दिवसांत एकूण 11.81 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून परतल्याची घोषणा केलेली असली, तरी राज्यातील विविध भागात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. मोसमी पावसानंतर आत्तापर्यंतचे पावसाचे प्रमाण 82.1 टक्के एवढे जास्त नोंद झाले आहे. वाळपई येथे सर्वाधिक 17.03 इंच पावसाची नोंद झाली आहे.

चोवीस तासांत साखळी आणि वाळपई भागात जोरदार पावसाची नोंद झाली, तर फोंडा, पेडणे, म्हापसा येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली. याशिवाय रात्री राजधानी पणजीतही पावसाने जोर धरला. वाळपईत काल 0.96 इंच आणि साखळीत 0.82 इंच पावसाची नोंद झाली.