राज्यात आत्तापर्यंत ६७ इंच पाऊस

0
120

राज्यात मागील चोवीस तासात राज्यात २.०१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ६६.९६ इंच पावसाची नोंद झाली असून पेडणे येथे सर्वाधिक ८२.०८ इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात काही निवडक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. निवडक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील चोवीस तासात म्हापसा आणि पेडणे येथे जोरदार पाऊस पडला. म्हापसा येथे ५.९० इंच आणि पेडणे येथे ४.५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण येथे २.३३ इंच, दाबोळी येथे २.०७ इंच, ओल्ड गोवा येथे १.९६ इंच, पणजी येथे १.८८ इंच, मुरगाव येथे १.८७ इंच पावसाची नोंद झाली असून इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.

आमठाणे धरण ९८ टक्के भरले
डिचोली तालुक्यातील आमठाणे धरण ९८ टक्के भरले आहे. काणकोण तालुक्यातील चापोली धरण ९० टक्के भरले आहे. सत्तरी तालुक्यातील अंजुणे येथील धरण ६१ टक्के भरले आहे. तिलारी धरण ८३ टक्के भरले आहे. फोंडा तालुक्यातील पंचवाडी धरण ६९ टक्के भरले आहे. गवाणे धरण ४३ टक्के भरले आहे. तर, सांगे तालुक्यातील साळावली धरण पूर्ण भरून