राज्यात आतापर्यंत 134 इंच पाऊस

0
9

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात आणखी 1.81 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 134.48 इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण 54.7 टक्के जास्त आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद वाळपई येथे आत्तापर्यंत 166.42 इंच एवढी नोंद झाली आहे.
राज्यात चोवीस तासांत पणजी येथे सर्वाधिक 2.71 इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे 2.37 इंच, मुरगाव येथे 2.48 इंच, मडगाव येथे 2.41 इंच, दाबोळी येथे 2 इंच, म्हापसा येथे 1.39 इंच, जुने गोवा येथे 1.81 इंच, साखळी येथे 1.22 इंच, वाळपई येथे 1.48 इंच, काणकोण येथे 1.43 इंच, सांगे येथे 1.14 इंच पावसाची नोंद झाली आहे.